सोसायट्यांनी लावले आव्हाड समर्थनाचे फलक
सोसायट्यांनी लावले आव्हाड समर्थनाचे फलक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, यासाठी प्रवेशद्वारांवर भला मोठा फलकच लावला आहे.
वाय जंक्शन येथे ग्लोबल पार्क ही प्रचंड मोठी आणि कौसा येथील नुरानी हाॅटेलशेजारी आमीर नामक तीन विंगची सोसायटी आहे. या दोन्ही सोसायट्यांमध्ये शेकडो कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांनी एकमुखी ठराव करून डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना मते देण्याचा निर्धार केला आहे. १५ वर्षांपूर्वी मुंब्रा-कौसा हा परिसर अविकसित होता. २००९ मध्ये डाॅ. जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर परिसराचा विकास होऊ लागला. आज शहरातील रस्ते, पाणी, वीज या सर्व समस्या मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांनी डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना पूर्ण समर्थन दिल्याचे आमीर आणि ग्लोबल पार्क सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले.
मतदानाचा निर्णय
सोसायट्यांनी डाॅ. जितेंद्र आव्हाडांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे इतर कोणत्याही उमेदवाराने प्रचारासाठी आपल्या सोसायटीत येऊ नये, यासाठी या दोन्ही सोसायट्यांनी प्रवेशद्वारावरच ‘हमारे सम्मानित नेता डाॅ. जितेंद्र आव्हाडसाहब को हमारा पूर्ण समर्थन और शुभकामनाएं’ असा संदेश लिहिलेले फलक लावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

