‘ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे’

‘ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे’

Published on

‘ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे’
उरण, ता. १७ (वार्ताहर) ः ही लढाई नुसती उरणची नाही, तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वातंत्र चळवळीचे महत्त्व या भूमीला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातले कार्यकर्ते लढले आहेत. या लढ्यात आगरी समाजाच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे. त्यामुळे आपल्या हक्काचा उमेदवार मनोहर भोईर यांना विधानसभेत पाठवा. त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उरण येथे केले. महाविकास आघाडीचे उरण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. १६) उरण येथील एन. हायस्कूलच्या मैदानात जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी खासदार संजय राऊत बोलत होते. आपल्या महाविकास आघाडीच्या विजयासाठी एक एक आमदार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मनोहर भोईर यांची हक्काची ही उरणची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायची आहे. हा आवाज विधानसभेत जायला पाहिजे, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com