विधानसभा निवडणूक म्हणजे मुंबई, महाराष्ट्र वाचवण्याची लढाई ः संजय राऊत

विधानसभा निवडणूक म्हणजे मुंबई, महाराष्ट्र वाचवण्याची लढाई ः संजय राऊत

Published on

विधानसभा निवडणूक म्हणजे मुंबई, महाराष्ट्र वाचवण्याची लढाई ः संजय राऊत
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला पाठीचा कणा दिला आहे, मात्र हा बळकट कणा दोन गुजराती व्यापारी खेचून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे काही चांगले दिसेल, त्या ठिकाणी यांच्या पाट्या लागत आहेत. मराठी माणसाला उपरा बनवण्याचा घाट घातला जात असून त्याला गद्दार साथ देत आहेत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज कोपरखैरणे येथे व्यक्त केला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के. मढवी यांची प्रचारसभा कोपरखैरणे येथील सेक्टर पाचमधील माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी शिवसेना फोडली. मुंबई गिळण्यासाठी मराठी माणसांना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून गुजराती व्यापाऱ्यांना वेगळी करता येणार नाही. ज्यांचा प्रवास शिवसेनेबरोबर सुरू होता, तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होते, मात्र त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर राजकीय प्रवेशाचे दशावतार सुरू झाले आहेत. उमेदवारीसाठी दारोदारी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईकर त्यांचे विसर्जन करणार आहेत. उद्योगांमध्ये ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळाल्या पाहिजेत, हा नियम शिवसेनाप्रमुखांनी तयार केला होता, मात्र हाच नियम स्वतःच्या स्वार्थासाठी नवी मुंबईत पायदळी तुडवण्यात आला. त्यामुळे नवी मुंबईत बेरोजगारांचा अकडा मोठा आहे, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत शिंदे सरकारच्या धोरणांवर टीका केली. याप्रसंगी काँग्रेसचे नेते भाई जगताप, ऐरोलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के. मढवी, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसचे नासीर हुसेन, राष्ट्रवादीचे गुरूज्योतसिंग सप्रा, लिलाताई लिमये आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com