उलवेमध्ये शेकापनेच सुविधा दिल्या : प्रितम म्हात्रे

उलवेमध्ये शेकापनेच सुविधा दिल्या : प्रितम म्हात्रे

Published on

उलवेमध्ये शेकापनेच सुविधा दिल्या : प्रीतम म्हात्रे
उरण, ता. १७ (बातमीदार) ः उलवे विभागात शेकापनेच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे उरण मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी उलवे येथे झालेल्या प्रचार सभेत सांगितले.
उलवे हा सिडकोचा विकसित नोड आहे; मात्र येथील रहिवाशांना अनेक सार्वजनिक, सामाजिक नागरी, जीवनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याबाबत सिडको पूर्णतः उदासीन असून येथील शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायती व पक्षाच्या पातळीवर येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या आहेत. भविष्यातही येथील रहिवाशांच्या समस्या शेकाप आपल्यापद्धतीने सोडवतील, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कॉम्रेड भूषण पाटील, प्रा. एल. बी. पाटील, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की, शेकाप सत्तेसाठी कधीच राजकारण करीत नाही. सत्ता असो वा नसो शेकाप जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत जनतेत राहते. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शेकापने अनेक प्रश्न सोडविले आहेत. या विभागात रेल्वेचा सरकता जिना तयार होऊनही गेली वर्षभर बंद होता, तो जिना आपण जाऊन सुरू केला. शहर एवढे सुसज्ज आहे; मात्र शहरात कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. गव्हाण ग्रुपच्‍या माध्यमातून आपण ती सुविधा उपलब्ध करून दिली. येथील शाळाप्रवेशाचे प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप दक्ष राहील. तसेच, येथील सतावणाऱ्या लहान-मोठ्या समस्या दूर करण्यासाठी २४ तास सेवा केंद्र सुरू करणार असल्याचे म्‍हात्रे यांनी सांगितले. येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी विशेष अभियान राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com