गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान

गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान

Published on

गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान
ऐरोली, बेलापूरमध्ये माथाडींची मोठी संख्या; उमेदवारांची होणार कसरत
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदा राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर निवडणुकांना अधिक रंगत आली असून मतदानाच्या दिवशी आपल्या मूळगावच्या मतदारसंघात जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे अवघड काम नवी मुंबईतील उमेदवारांना करावे लागणार आहे.
ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात माथाडी मतदारांची संख्या मोठी आहे. बेलापूर ते ऐरोली-दिघापर्यंत माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात राहतात. माथाडी मतदार हे मतदानासाठी आपल्या मूळगावी जातात. यंदाही माथाडींशी संपर्कात असलेले पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनेकांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच नवी मुंबईत आपल्या मूळगावच्या मतदारसंघातील मतदारांचे मेळावे नवी मुंबईत घेतले होते. २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मूळगावी जाण्यासाठी उमेदवारांनी वाहनांचीही सोय केली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत माथाडी मतदारांना थांबवण्यासाठी नवी मुंबईतील उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. नेरूळ, सानपाडा, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली ते अगदी ऐरोलीपर्यंतच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार राहतात. या माथाडी कामगारांची नाळ आपल्या मूळगावाशी व तेथील आमदारांशी जोडलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात माथाडी कामगारांशी जवळील असलेले नेते यंदा निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील आपले मूळ मतदार हे गावी मतदानाला आणण्यासाठी जवळजवळ सर्वच उमेदवारांनी वाहनांची सोय केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघातून मूळगावी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्‍हान दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना करावे लागणार आहे. त्यामुळे गावी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना रोखणे मोठे आव्हान ठरणार आहे.
.......................
नवी मुंबईत राहणाऱ्या माथाडी कामगारांची नाळ ही आपल्या मूळगावाशी व आमदारांशी जोडली गेली आहे. त्यामुळे ते मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित आहे. वाशी, कोपरखैरणे, घणसोली विभागात माथाडी कामगारांची संख्या खूप मोठी आहे. माथाडी कामगारांशी जवळचा संपर्क असलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते आमदारकीला उभे आहेत. त्यामुळे माथाडी कामगार मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित मानले जात आहे.
नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com