अमली पदार्थांसह नायजेरीयनला अटक

अमली पदार्थांसह नायजेरीयनला अटक

Published on

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : तळोज्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना पाच कोटी ६२ लाखांच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. तर, पासपोर्ट, व्हिसाची मुदत संपलेली असताना राहण्यासाठी घर देणाऱ्या दोघे घरमालक गुन्ह्यात सहआरोपी आहेत.
तळोजा धरणा कॅम्प येथील शिर्के बिल्डिंगमध्ये भाड्याने राहणारे दोघे नायजेरियन अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला होता. पोलिसांनी या प्रकरणात ओनयेका इलोडिन्सो (२५) या नायजेरियन नागरिकाच्या घराची झडती घेतली असता तब्बल पाच कोटी ६२ लाख ७० हजारांचे दोन किलो ४२ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन तर १७४ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. तर, त्याच इमारतीतील रूम नंबर ३०१ मध्ये राहणाऱ्या चिडीबेरे मुओघालु (४०) या नायजेरियन व्हिसाची मुदत संपलेली असताना बेकायदा राहत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस ॲक्ट तसेच परदेशी नागरिक कायदा व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्टअन्वये कारवाई केली. दोघांची न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. तसेच, बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती लपवणारे घरमालक रमेश पावशे आणि नामदेव ठाकूर यांना सहआरोपी केले आहे.
---------------------------------------------------------
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
घरातील भाडेकरूंची पार्श्वभूमी तपासण्याचे निर्देश दिले आहेत. परदेशातील नागरिकांचे पासपोर्ट, सी फॉर्म यांची खात्री करावी. तसेच, कायदेशीर भाडेकरारनामा करताना जागेचा बेकायदेशीर कामांसाठी वापर होत नसल्याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com