मुरबाडमध्ये गाव-भेटींना वेग!

मुरबाडमध्ये गाव-भेटींना वेग!

Published on

बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : मुरबाड मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रचार आता जोर शोर से सुरू आहे. गाव-खेड्यांत उमेदवारांच्या भेटींना वेग आला आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी मुरबाड तालुक्यातील गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांबरोबर संवाद साधून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तेथील ग्रामस्थांनीही ‘यंदा परिवर्तन हवेच’, असा सूर व्यक्त करत पवार यांच्या पाठिशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपुष्टात येण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असताना मुरबाड मतदारसंघाच्या विविध भागांत प्रचार जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि शरद पवार पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांनी प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात टोकावडेजवळील सावताचा पाडा, एकलहरे, गोरेगाव, पेंढरी, वाघाची वाडी, गोड्याचा पाडा, वैशाखरे, बोरवाडी अशा ग्रामीण भागांतील नागरिकांची भेट घेतली. तसेच त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. या भागासाठी निवडून आल्यानंतर करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली.
या वेळी पेंढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनाजी वाघ, बाळू वारघडा यांच्यासह सदस्य नीलम वाघ, कल्याणी वाघ, रमेश कवटे, चिमन खंडवी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
मुरबाडला आल्यावर, मी बदलापूरचा विकास केला. बदलापूरला गेल्यावर मी मुरबाडचा विकास केला, असे आमदार रेटून सांगतात. परंतु, खरी परिस्थिती काय आहे, हे आपण सर्व सुजाण मतदार जाणत आहात. आपण यावेळी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सुभाष पवार यांनी केले.

ग्रामस्थांनी मांडली कैफियत
दौऱ्यात अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते आणि सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची समस्या जाणवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर निवडून आल्यानंतर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com