वाहन अपघातात तीन जण जखमी
वाहन अपघातात तीन जण जखमी
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी तीन पोलिस ठाण्यात तिघा चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पहिल्या घटनेत शुक्रवारी (ता. १५) कशेळी येथील गेट क्रमांक एकसमोर पहाटे चारच्या सुमारास टेम्पोचालकाने दुचाकीस्वार रविकांत पांडुरंग भुरे यांना समोरून जोरदार धडक दिली व घटनास्थळावरून पलायन केले आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात नारपोली ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत गैबीनगर रोडवरील इस्माईल मिरची यांच्या ऑफिससमोरून आयशा तौसिफ सय्यद यांचा मुलगा १४ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता शाळेतून घरी पायी परतत होता. यावेळी एका दुचाकीस्वाराने त्याला जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिसऱ्या घटनेत पद्मानगर परिसरातील टोरंट पॉवरच्या ऑफिसजवळ चारचाकीच्या चालकाने उस्मान हनीफ मानक्या (२३) यास गंभीर जखमी करून पलायन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

