जीवनाच्या अखेरीस दुसऱ्यांना जीवदान
जीवनाच्या अखेरीस दुसऱ्यांना जीवदान
एकूण अवयवदानात ज्येष्ठांचा वाटा ५१ टक्के; मेंदूमृत अवयवदानातून ७० जणांना नवजीवन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईत अवयवदानाबाबत लोक जागरूक होत आहेत. त्यामुळेच यावर्षी अवयवदानाच्या संख्येने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला आहे. वर्ष २०२४ संपायला अजून एक महिना बाकी आहे. या ११ महिन्यांत मुंबईत ५४ अवयवदान झाले आहे. या ५४ अवयवदानांपैकी ५१ टक्के मेंदूमृत वृद्ध व्यक्तींनी अवयवदान केले आहे. यापैकी अनेक ज्येष्ठ असे होते, ज्यांनी मृत्यूपूर्वीच आपले अवयव गरजू रुग्णांना दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आयुष्याच्या अखेरीस ज्येष्ठ नागरिकांनी ७० हून अधिक लोकांना नवसंजीवनी दिली आहे.
देशात अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, जुलै महिना दरवर्षी अवयवदान महिना म्हणून साजरा केला जातो. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) नुसार, १ जानेवारी ते १६ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत आतापर्यंत ५४ मेंदूमृत रुग्णांनी आपले अवयवदान केले आहे. यापैकी २८ मेंदूमृत वृद्धांचे अवयव दान करण्यात आले असून त्यामुळे अनेकांना नवजीवन मिळण्यास मदत झाली आहे.
वर्षानुवर्षे विक्रमी अवयवदान झेडटीसीसीनुसार अवयवदानाची संख्या वाढत आहे. त्यामुळेच, अवयवदानाबाबत मुंबईत दरवर्षी नवनवीन विक्रम होत आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अधिक अवयवदान झाले आहे. २०२३ मध्ये ५० मेंदूमृत रुग्णांमधून १४४ जणांना अवयवदानातून नवीन जीवन मिळाले, तर २०२२ मध्ये ४७ मेंदूमृत रुग्णांच्या अवयवदानामुळे १२४ जणांना जीवदान मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

