मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

Published on

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर मतदारसंघात मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे ५०३ मतदान केंद्रांसाठी दोन हजारांहून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सुमारे २० टक्के राखीव कर्मचारीदेखील उपलब्ध करण्यात आले आहेत. संपूर्ण मतदान यंत्रणेवर सीसीटीव्हीची बारकाईने नजर असणार आहे.

इमारत, तंबू आदी ९९ ठिकाणी ५०३ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यात ५०३ मतदान केंद्रे अधिकाऱ्यांसह, १००६ सहाय्यक व ५०३ शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत, तसेच सुमारे २० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी मिळून एकूण ५०३ मतदान यंत्रे आणि १० टक्के राखीव मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे असणार आहेत. संपूर्ण मतदान प्रक्रियेवर ६० क्षेत्रीय अधिकारी व त्याचे ६० सहाय्यक अधिकारी नजर ठेवून असणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्रावर स्वतंत्र रॅम्प, आरोग्य पथक, तसेच मतदारांचे यादीतील नाव शोधून देण्यासाठी कर्मचारी आदी व्यवस्था मतदान केंद्रांवर असणार आहे.

मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही
मतदान केंद्रांचे शंभर टक्के वेब कास्टींग करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. शिवाय मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींची सुविधा करण्यात आली आहे.

वयोवृद्धांना थेट प्रवेश
ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वयोवृद्ध नागरिकांना मतदानासाठी रांगेत उभे रहाण्याची आवश्यकता नाही. त्यांना मतदानासाठी थेट केंद्रात जाता येणार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी केंद्रातच बसण्यासाठी स्वतंत्र मंडपदेखील बांधण्यात आला आहे.

मोफत सेवेसाठी नोंदणी आवश्यक
महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा असणार आहे. याव्यतिरिक्त ८५ हून अधिक वय असणाऱ्या व्यक्ती ज्यांनी गृहमतदान केलेले नाही, अशा व्यक्तींना नेण्या-आणण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, मात्र त्यासाठी अशा व्यक्तींनी निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपमध्ये त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com