मतदान केंद्रावरील गैरसोयीसाठी तलाठी, ग्रामसेवक जबाबदार

मतदान केंद्रावरील गैरसोयीसाठी तलाठी, ग्रामसेवक जबाबदार

Published on

मतदान केंद्रावरील गैरसोयीसाठी तलाठी, ग्रामसेवक जबाबदार
वज्रेश्वरी, ता. १९ (बातमीदार) : विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी त्या-त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचाऱ्यांची असेल. मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही, तसेच १०० मीटरच्या आत मोबाईल बंदी असेल, तसेच चिन्ह असलेली चिठ्ठी मतदाराला दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर क्रमांक लिहिला आहे का, पुरेसे फर्निचर, वीज, पाणी, प्रसाधनगृह, आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करावी लागणार आहे. याशिवाय मतदान केंद्रावर जारचे पाणी पुरवण्यात यावे, साहित्याची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्या ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे, त्यांनी या कामाबरोबरच स्वतःच्या गावातही जबाबदारी पार पाडायची आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरापर्यंत यात्रा, उरुस, भजन, कीर्तन, प्रवचन ठेवता येणार नाही, तसेच बॅनर्स, पोस्टर्स काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदान केंद्रे सत्तर टक्के वेबकास्ट केली गेली आहेत. त्यामुळे सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट आशा सेविकांकडे देण्यात येईल. १०० मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणालाही प्रवेश करता येणार नाही, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आयोगाच्या सूचना
* मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद राहतील.
* मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे मंडप उभारावे.
*१०० मीटरच्या आत मोबाईल नेता येणार नाही.
* केंद्रे ७० टक्के वेबकास्टिंगने जोडावी लागणार आहेत.
* मतदान केंद्रावरील सर्व सोय ग्रामसेवक, तलाठी करतील. अनुचित प्रकार घडल्यास गंभीर दखल घेतली जाणार आहे.
*बारा पुराव्यांपैकी एक पुरावा घेऊनच मतदानाला यावे.
*मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही.
* दिव्यांग व ८० वर्षांवरील वयोवृद्धांच्या सोयीसाठी वाहन व्यवस्था असेल.
* चिन्ह असलेली चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com