गुरु नानक महाविद्यालयाचा मतदार जागृती उपक्रम
गुरुनानक महाविद्यालयाचा
मतदार जागृती उपक्रम
धारावी, ता. १९ (बातमीदार) : गुरुनानक महाविद्यालयाच्या मतदार साक्षरता क्लब, संविधान क्लब आणि १७९ सायन कोळीवाडा मतदारसंघ नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती उपक्रम राबवण्यात आला.
विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमाची सुरुवात मतदाराची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विभागामध्ये मतदार जागृतीचे फलक व घोषवाक्य देत मतदार जागृती फेरीचे आयोजन केले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्देर कौर भाटिया यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. मतदार साक्षरता क्लब आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख यांनी लोकशाही आणि युवा या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे आयोजन १७९ सायन कोळीवाडा मतदारसंघ नोंदणी अधिकारी डॉ. जयकृष्ण, फड आणि स्वीप समन्वयक किरण गायकवाड यांच्या सहकार्याने केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राध्यापक सुमित खरात यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

