थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

थोडक्‍यात बातम्या रायगड
स्वरा पाटीलला युनिफाइट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
पेण (वार्ताहर) : तालुक्यातील काळेश्री गावाची सुकन्या स्वरा पाटील हिने रशिया येथे झालेल्या जागतिक युनिफाइट चॅम्पियनशिप, जागतिक युनिव्हर्सल कॉम्बॅट चॅम्पियनशिप २०२४ मध्ये प्रथम येऊन सुवर्णपदक मिळवून चॅम्पियन बेल्टवर आपले नाव कोरले आहे. शहरातील कोनाएन्सेस स्कूलमधील १७ वर्षीय स्वरा पाटील हिचे परिसरात कौतुक होत आहे.
....................
रोह्यातून आळंदीकडे पायी दिंडीचे प्रस्थान
रोहा (बातमीदार) ः गेल्या २४ वर्षांची अखंड परंपरा राखत याही वर्षी रोहा तालुक्यातील संभे येथून आळंदीकडे सोमवारी (ता.१८) रौप्यमहोत्सवी पायी वारी दिंडीचे प्रस्थान मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात आळंदीकडे झाले आहे. स्वा. सु. गुरुवर्य अलिबागकर बाबा यांच्या कृपाछत्राखाली व स्वा. सु. गुरुवर्य गोपाळ बाबा यांच्या आशीर्वादाने, तसेच रायगड भूषण नारायण महाराज दहिंबेकर व रायगड भूषण वै. नारायण महाषळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याचे उगमस्थान भैरीनाथ मंदिर येथून झाले. या सोहळ्यात दैनंदिन वास्तव्याच्या ठिकाणी नित्यनेमाने काकड आरती, नामस्मरण, सायंकाळी हरिपाठ, हरि कीर्तन, हरिजागर आदी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. समाजातील अनेक दिग्गज मान्यवरांनी या दिंडीचे पूजन करून दर्शन घेतले, तर सोहळ्याच्‍या यशस्वीतेसाठी अध्यक्ष तुकाराम बांदल, उपाध्यक्ष अनंत सानप, सेक्रेटरी पांडुरंग सानप, गणेश नलावडे, खजिनदार जितेंद्र दहिंबेकर, दत्ता तेलंगे आदी पदाधिकारी यांच्यासह दिंडीचे सर्व सदस्य, तसेच ज्ञानेश्वर सत्संग वारकरी सेवा मंडळ संभे व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व वीर हनुमान क्रीडा मंडळ संभे अधिक मोलाचे सहकार्य करीत आहेत.
..................
निलेश देवकर यांचे निधन
रोहा (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील कृषिनिष्ठ बाहे गावातील निलेश जानू देवकर यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान नवी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. निलेश देवकर यांच्‍या निधनाने समस्त देवकर परिवारासह बाहे गावावर शोककळा पसरली आहे, तसेच परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, एक बहीण, पुतणे, भाचे असा मोठा परिवार असून त्यांचा दशक्रियाविधी २६ नोव्हेंबर रोजी, तर अंतिम धार्मिकविधी २९ नोव्हेंबर रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com