विकास महाविद्यालयात मतदान जनजागृती

विकास महाविद्यालयात मतदान जनजागृती

Published on

विकास महाविद्यालयात मतदान जनजागृती
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी बहुसंख्येने आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये व आजच्या तरुण वर्गात मतदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने विक्रोळी येथील विकास कला, विज्ञान व वाणिज्य महविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे मतदान जनजागृती फेरी आणि मतदान शपथ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते.
एनएसएस युनिटमधील विद्यार्थी आपले सामाजिक दायित्व म्हणून मतदान केंद्रांवर विविध प्रकारे मदत करतात. राष्ट्रनिर्माणासाठी मतदान करा, तुमचे मत, तुमचा आवाज, उज्‍ज्वल भविष्यासाठी, आजच मतदान करा, आदी जनजागृतीपर संदेशफलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. विकास महाविद्यालयातून ही फेरी निघाली व कन्नमवारनगर परिसरातून मार्गस्थ होऊन महविद्यालयात परत दाखल झाली. विविध घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या फेरीमध्ये १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे अधिकारीसुद्धा होते. ६३ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
संस्थेचे सचिव डॉ. विनय प. राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. पात्रा, एनएसएस युनिट कार्यक्रम अधिकारी प्रा. विनायक मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com