निवडणुकीचे साहित्य पोहोचविण्याचे काम पूर्ण
निवडणुकीचे साहित्य पोहोचविण्याचे काम पूर्ण
मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान केंद्र असणाऱ्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात कर्मचारी व निवडणुकीचे साहित्य पोहोचविण्याचे अवघड काम निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १९) पार पाडले. मुरबाड शहराच्या पूर्वेला माळशेज घाटाच्या पायथ्यापर्यंत तर पश्चिम बाजूला कल्याण तालुक्याच्या रायते गावापर्यंत ८० किलोमीटर अंतरामध्ये मुरबाड मतदारसंघ पसरला आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकूण ५१८ मतदान केंद्र आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त मतदान केंद्र असणाऱ्या मुरबाड मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी ३,१०८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक साहित्य व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ६४ बस, १६ मिनी बस, ६८ जीप व इतर वाहने अशी एकूण २३४ वाहने तैनात ठेवली आहेत. मतदान साहित्यवाटपासाठी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य मंडप टाकण्यात आला आहे. या परिसरात जाण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागली होती. मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या ४,७०,०४० आहे. एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदार संख्या
पुरुष मतदार - २,४२,२४९
स्त्री मतदार - २,२७,७७३
इतर - १८
एकूण मतदार - ४,७०,०४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

