बरणीत डोके अडकलेल्या श्वानाची सुटका

बरणीत डोके अडकलेल्या श्वानाची सुटका

Published on

बरणीत डोके अडकलेल्या श्वानाची सुटका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : पाण्याच्या शोधात फिरत असताना एका श्वानाचे प्लॅस्टिकच्या जारमध्ये डोके अडकले. गेल्या आठवड्याभरापासून हा श्वान त्याच अवस्थेत सुटकेसाठी सैरावैरा फिरत होता. पॉज या प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत या श्वानाची सुखरूप सुटका केली. डोंबिवलीजवळील ग्लोब इस्टेटजवळील एका सोसायटीच्या आवारात एक भटके श्वान पाण्याच्या शोधात फिरत असताना एका प्लॅस्टिकच्या जारमध्ये डोके अडकवून बसला.

रस्त्यावर भटकणाऱ्या श्वानाची अन्न-पाण्यावाचून झालेली अवस्था पाहून सोसायटीचे सदस्य कईद काचवाला यांना दया आली. त्यांनी पॉज संस्थेशी त्यांचा इन्स्टाग्राम अकाउंटवरून संपर्क केला. पॉजचे संस्थापक डॉ. नीलेश भणगे यांनी पालिकेच्या श्वान पथकाला तत्काळ पाचारण केले. श्वानपथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाचे प्रमुख कैलास यांनी चार सहकाऱ्यांसह जाळीच्या मदतीने श्वानाला पकडले. तब्बल दोन तास पाठलाग केल्यानंतर श्वान त्यांच्या तावडीत सापडला. पॉज संस्थेने या श्वानाचे आदीशी असे नामकरण करून केडीएमसीच्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. प्रकृती ठीक झाल्यानंतर नसबंदी आणि रेबीज लसीकरण करून त्याला पुन्हा त्याच्या परिसरात सोडण्यात येणार असल्याचे पॉजचे संस्थापक डॉ. नीलेश भगणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com