स्टारप्रचारकांनी २४ तासात जिल्हा सोडावा

स्टारप्रचारकांनी २४ तासात जिल्हा सोडावा

Published on

स्टार प्रचारकांनी २४ तासांत जिल्हा सोडावा
जिल्हा निवडणूक विभागाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक व कार्यकर्ते प्रचारासाठी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत, अशा स्टार प्रचारक व कार्यकर्त्यांनी येत्या २४ तासांत जिल्हा सोडावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. तसेच, न केल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होईल, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.

विधानसभा निवडणुकीची धामधूम राज्यात सर्वत्र सुरू आहे. दिवाळीनंतर म्हणजेच ४ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली. मागील १५ दिवस केलेला विकास आणि न झालेल्या विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. महाविकास आघाडीच्या काळात विकासकामे कशी रोखली गेली, ती महायुतीच्या कार्यकाळात कशी सुरू झाली, याचा पाढा महायुती आणि महाविकास आघाडीकडून वाचला गेला. त्यात प्रचार रॅली, बाईक रॅली, पायी रॅली, चौक सभा आणि सभांच्या माध्यमातून मागील १५ दिवस प्रचाराचा धुरळा उडविल्यानंतर सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बुधवारी (ता. २०) विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार चोख पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ आदी सज्ज ठेवले आहे.

...तर गुन्हा दाखल होणार
मागील १५ दिवसांपासून निवडणुकीसाठी सुरू असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी त्यांच्या सभा घेण्यासाठी स्टार प्रचारक आणि कार्यकर्ते हे ठाणे जिल्ह्यातही दाखल असतील. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार या स्टार प्रचारक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात व मतदारसंघात राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील व्यक्ती असल्यास त्यांनी २४ तासांत जिल्हा सोडवा, असे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहे. तसे न केल्यास एखादी व्यक्ती आढळून आल्यास तिच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com