मनोरुग्णालयांतील मनुष्यबळाच्या कमतरतेवर मात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : राज्यातील मनोरुग्णालयात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे; मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील तीन मनोरुग्णालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असून प्रत्येक मनोरुग्णालयात सहा निवासी डॉक्टर, अनेक प्रशिक्षित परिचारिका आणि मानसशास्त्रज्ञ उपलब्ध होणार आहेत.
राज्य सरकार संचालित मनोरुग्णालयांमध्ये २,१६९ मंजूर पदांपैकी ४,९६ पदे रिक्त आहेत. त्यापैकी, पुण्यातील मनोरुग्णालयात सर्वाधिक पदे रिक्त आहेत. पुण्यातील मनोरुग्णालयात ९५४ मंजूर पदांपैकी १९१ पदे रिक्त आहेत. याशिवाय ठाणे मनोरुग्णालयात ७२३ मंजूर पदांपैकी १४२ पदे रिक्त आहेत. तर, नागपूरच्या मनोरुग्णालयात ३७५ मंजूर पदांपैकी ११५ पदे रिक्त आहेत. यामध्ये मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार परिचारिकांचा समावेश आहे. रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची २५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने आता आरोग्य विभागाने शैक्षणिक वर्षापासून तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
.................................................
ठाणे, पुणे आणि नागपूर येथील रुग्णालयात एक प्रादेशिक मानसोपचार संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, प्रथमच एमडी (मानसोपचार), एमए क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक नर्सिंगचे अभ्यासक्रम प्रत्येकी दोन पदांसह सुरू होतील. त्यामुळे तीन वर्षांच्या आत प्रत्येक मनोरुग्णालयात सहा निवासी डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका आणि मानसशास्त्रज्ञ असतील.
- डॉ. स्वप्नील लाळे, संचालक, आरोग्य संचालनालय विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

