मुरबाडमधील बँक ऑफ महाराष्ट्र पाच दिवस बंद राहणार
मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : मुरबाड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मुरबाडमधील बँक ऑफ महाराष्ट्र बँक पाच दिवस बंद राहणार आहे. याबाबत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांना विचारले असता, त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी फार मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची गरज असल्याने बँकेतील कर्मचारी निवडणूक कामासाठी घेतले असल्याचे सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्राची मुरबाड शाखा बुधवारी (ता. २०) खुली ठेवण्यात आली आहे; पण बँकेत फक्त व्यवस्थापक उपलब्ध असणार आहेत. रोखीचे कोणतेही व्यवहार करण्यासाठी एकही कर्मचारी बँकेत उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य खातेदारांना पैसे काढता येणार नाही. मंगळवारीही ग्राहकांची गैरसोय झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी बँकेतील कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेचे कामकाज सलग चार दिवस बंद पडणार आहे. या प्रकाराची निवडणूक आयोग व बँक व्यवस्थापनाने दखल घेऊन कोणत्या अधिकाराखाली बँक बंद करण्यात आली, याची चौकशी व्हावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.
निवडणूक कामासाठी बँकेचा सर्वच कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. एका कर्मचाऱ्याची आई आजारी असल्याने तो गैरहजर राहिला आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्या खातेदारांना रोख रक्कम काढता किंवा भरता येत नाही. सलग पाच दिवस बँक व्यवहार होणार नाहीत.
- संतोष कुबल, व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र मुरबाड शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

