ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ शिंदे सेनेत

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ शिंदे सेनेत

Published on

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ शिंदे सेनेत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडून विधानसभेची उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या थरवळ यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. त्याचवेळी ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर त्यांनी ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत शिंदे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सदानंद थरवळ, त्यांचा मुलगा अभिजित थरवळ व इतर शिवसैनिकांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाकडून डोंबिवली विधानसभेची उमेदवारी दीपेश म्हात्रे यांना जाहीर होताच थरवळ हे नाराज झाले होते. त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा व पक्षाला रामराम करत असल्याचे पत्र समाजमाध्यमातून व्हायरल करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्याचवेळी थरवळ हे शिंदे गटात जातील, याची जोरदार चर्चा होती. ‘सकाळ’ने त्याविषयी वृत्तदेखील प्रसारित केले होते. ते वृत्त खरे ठरले असून विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावताच थरवळ यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com