समाजमाध्यमांवर उमेदवारांचा प्रचार सुरुच!
समाजमाध्यमांवर उमेदवारांचा प्रचार सुरूच!
निवडणूक आयोगाचे मात्र साफ दुर्लक्ष
बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होणार आहे. नियमाप्रमाणे मतदानाच्या साधारण ३६ तास आधी प्रचार बंद होतो. त्याप्रमाणे यंदा प्रचाराच्या तोफा सोमवारी (ता. १८) सायंकाळी ५.३० वाजता थंडावल्या; मात्र बदलापूर शहरात व्हॉट्सॲप आणि इतर समाजमाध्यमांतून उमेदवारांचा प्रचार अजूनही सुरू आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर निवडणूक आयोग कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नियमाप्रमाणे मतदानाच्या ३६ तास आधी प्रचार थांबवला जातो. यावेळेत एकीकडे प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया करण्याची धडपड असते, तर दुसरीकडे मतदान कोणाला करायचे, याबाबत मतदारराजाच्या मनाची तयारी सुरू असते आणि या काळात कोणत्याही पक्षाने प्रचार करू नये, अशा कडक सूचना आणि नियम आहेत; मात्र मुरबाड मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या या नियमांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. समाजमाध्यम आणि व्हॉट्सॲपसारख्या प्रभावी माध्यमांवर काही पक्ष कार्यकर्ते मतदान करताना काय काळजी घ्यावी, या आशयाचे मेसेज टाकत आहेत. त्याखाली आपल्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करा, अशा सूचनादेखील करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

