कोंडीमुक्त मतदानासाठी वाहतूक विभाग सज्ज

कोंडीमुक्त मतदानासाठी वाहतूक विभाग सज्ज

Published on

कोंडीमुक्त मतदानासाठी वाहतूक विभाग सज्ज
ठाणे शहर, ता. १९ (बातमीदार) : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी ठाणे विभागाची वाहतूक यंत्रणासुद्धा सतर्क झाली आहे. महत्त्वाच्या मतदान केंद्रांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चोख नियोजन केले आहे. वाहतूक कर्मचारी, स्वयंसेवक आणि संस्थांच्या मदतीने वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

मतदानाचाच्या दिवशी राज्यभरात शासकीय सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे वाहतुकीवर जास्त ताण येण्याची चिन्हे नसली तरी ठाणे आयुक्तालयातील मतदान शांततेत आणि कोंडीमुक्त व्हावे, यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. ज्या ठिकाणी १० पेक्षा जास्त मतदान केंद्रे असणार आहेत. अशा ठिकाणी वाहतूक विभागाचा एक कर्मचारी आणि त्यांच्यासाठी इतर बळ पुरवले जाणार आहे. निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देणे या नियमानुसार वाहतूक विभागातील सुमारे ३५० कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवले आहेत. अशावेळी रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने स्वयंसेवक, संस्थांचे कार्यकर्ते, होमगार्ड आणि इतर बळ उभे करून वाहतुकीचे नियोजन केले आहे.

मतदान केंद्राच्या परिसरात निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या रेषेच्या आत कोणतेही वाहन जाता कामा नये, यासाठी त्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी आणि त्याच्यासोबत इतर बळ उभे केले आहे. यासोबतच निवडणुकीचे साहित्य मतदार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि हे साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लागणाऱ्या मार्गावर कोंडी होणार नाही, याची काळजी वाहतूक विभागाने घेतली आहे. प्रचाराच्या दिवसांत वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबतची चोख भूमिका बजावल्यानंतर मतदान आणि मतमोजणीच्या वेळीही आमचे अधिकारी, कर्मचारी ही भूमिका योग्य प्रकारे बजावतील.
-पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com