निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज
निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण ३,७३,६४५ मतदार आहेत. या मतदारांच्या सेवेसाठी निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी केले.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्रे ३३५ आहेत. निवडणुकीत एकूण ११ उमेदवार उभे आहेत. यासाठी एकूण ३३५ ईव्हीएम लागणार असून २० टक्के अधिक मशीन तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. याप्रमाणे २० टक्के वाढीवनुसार बी.यू. ४०२, सी.यू. ४०२ व ३० टक्केप्रमाणे ४३५ व्हीव्हीपॅट मशीनची व्यवस्था केली आहेत. भिवंडी विधानसभा मतदारसंघात एक अपंगांचे केंद्र, एक सखी मतदान केंद्र व एक युवा मतदार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक, दोन व तीन, शिपाई यांची नेमणूक केली आहे. एकूण मतदान केंद्राध्यक्ष ३३५, मतदान अधिकारी एकूण ३३५, एकूण १००५ कर्मचारी, शिपाई ३३५ व राखीव कर्मचारी ४१९ असून प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी असे एकूण ३३५ पोलिस तसेच ओळख पटवण्यासाठी ३३५ अंगणवाडी सेविका असे एकूण २,७६४ कर्मचारी नियुक्त आहेत. तसेच, ३७ क्षेत्रीय अधिकारी व ३७ सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण ३७ झोनमध्ये २१ मोठ्या बस, मिनी बस ४७, जीप सहा, रिक्षा ५० व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी ४० आणि राखीव मिळून एकूण १६४ वाहनांची व्यवस्था केली आहे. मतदान जनजागृती करण्याकरिता स्वीप उपक्रमाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतून, माध्यमातून मतदान जनजागृती केली आहे.
३० रिक्षांची व्यवस्था
मतदाराची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याकडेदेखील लक्ष देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय, व्हीलचेअर, पाळणाघर, सावलीकरिता मंडप, प्रथमोपचार सोयी, आशा वर्कर यांच्यादेखील नेमणुका केल्या आहेत. दिव्यांग मतदारांकरिता ३० रिक्षांची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार स्लिपवाटपाचे कामदेखील सुरू केले आहे. निवडणुकीच्या कामाकरिता संपूर्ण निवडणूक प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे, अशी माहिती अमित सानप यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

