ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक

ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक

Published on

ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना सोमवारी (ता. १८) रात्री घडली.

मतदारसंघात पैसे वाटप सुरू असल्याचा संशय आल्याने धनंजय बोडारे यांचे कार्यकर्ते आणि काही महिलांसोबत त्यांची मुलगी धनश्री हे आपल्या कारमधून कॅम्प नंबर चार ओटी सेक्शन परिसरात गेले. याचवेळी अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात दुसऱ्या गाडीत असलेल्या धनश्री बोडारे, महिला थोडक्यात बचावल्या. यावर धनंजय बोडारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही फक्त आमच्यावर नव्हे, तर हा लोकशाहीवर झालेला हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी बोडारे यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com