कर्नाटकात सोयाबीनला दिल्या जाणाऱ्या दरावरून भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातच सोयाबीनला ३,८००चा भाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल : खासदार डॉ. अनिल बोंडे
संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदर्भातील प्रचारसभांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन दिले आहे. पण, काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात साधारणत: ३ हजार ७५१ रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात आहे. हमीभावापेक्षा जवळपास १ हजार १४१ रुपयांनी हे दर कमी आहेत.
केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित आहेत. काँग्रेसने आधी कर्नाटकात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव मिळवून द्यावा, असे आव्हान शेतकऱ्यांकडून दिले जात आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात सोयाबीनला दिल्या जाणाऱ्या दरावरून भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

