ट्रेलरच्या अपघातात चालक जखमी
ट्रेलरच्या अपघातात चालक जखमी
खालापूर, ता. १९ (बातमीदार) : सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर दोन ट्रेलरचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी (ता. १९) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खरसुंडी गावाजवळ घडली. या अपघातात काॅइल ट्रेलरचालक गंभीर जखमी झाला आहे. सावरोलीहून खारपाडाच्या दिशेने अवजड लोखंडी नांगर घेऊन जाणारा ट्रेलरने समोरून येणाऱ्या कॉइलच्या ट्रेलरला धडक दिली. या अपघातात कॉइल ट्रेलरचालक बाबूलाल केबिनमध्ये अडकला. या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलिस, देवदूतपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर केबिनमध्ये अडकलेल्या ट्रेलरचालकाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात ट्रेलरचालक बाबूलालच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचाराकरिता खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला एमजीएम कळंबोली येथे हलविण्यात आले आहे. या मार्गावर अवजड वाहनांची धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असून याठिकामी होणाऱ्या अपघातामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

