एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची फौज

एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची फौज

Published on

एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची फौज
सुरळीत मतदानासाठी करणार मदत
मुंबई, ता. १९ : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई विद्यापीठ, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठासह एसएनडीटी विद्यापीठातील एनएसएस आणि एनसीसीचे कॅडर विविध ठिकाणी मतदान यंत्रणांना मदत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मुंबईतील बहुतांश महाविद्यालयातील सुमारे दोन हजारांहून अधिक तरुण आणि तरुणी सकाळी सात वाजल्यापासून नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर हजर होणार आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात आपला वाटा उचलून मतदारांना विविध प्रकारचे मार्गदर्शन आणि मदत करणार आहेत.
मुंबईत यापूर्वीच एनएसएस आणि एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृतीसाठीचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. यासाठी महाविद्यालयांमध्ये एसव्हीईईपीअंतर्गत कॉलेज कॅम्पस ॲम्बेसेडर निवडण्यात आले होते; तर दुसरीकडे मतदानासाठी संकल्पपत्र भरून घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. आता एनएसएस आणि एससीसीचे कॅडर हे त्यांना दिलेल्या प्रशिक्षणानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com