आम्ही मतदान करणार असून तुम्हीही मतदान करा
आम्ही मतदान करणार असून तुम्हीही मतदान करा
नवमतदार पहिल्यांदा बजावणार हक्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदार २० नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहेत, पण तरुणवर्गापैकी दीड लाखाहून अधिक जण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. देशासाठी, आपल्या अधिकारासाठी आणि जबाबदारी म्हणून आम्ही मतदान करणार असून तुम्हीही मतदान करा, असे आवाहन नवमतदारांनी केले आहे.
मुंबईत एकूण एक कोटी एक लाखाहून अधिक मतदार विधानसभेच्या निवडणुकीत मत नोंदवणार आहेत, तर एक लाख ६० हजार नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांपैकी ४७ लाख महिला असून सर्वाधिक महिला मतदार मालाडमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात, तर २६ विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा एक कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ४७ लाख महिला, तर ५४ लाख पुरुष मतदार आहेत. मुंबईत सर्वाधिक मतदार उपनगरातील चांदिवली परिसरात आहेत, तर सर्वांत कमी मतदार शहर भागातील वडाळा परिसरात आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नवमतदारांकडे लक्ष लागणार असून, एकूण मतदारांच्या दोन टक्क्यांहून अधिक संख्या ही १८-१९ वयाच्या नवमतदारांची आहे. अनेक ठिकाणी हे प्रमाण तर तीन टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मार्जिन आणि नवमतदारांच्या संख्येचे प्रमाण बघता ५६ मतदारसंघांमध्ये नवमतदारावर बरीच मदार असल्याचे चित्र आहे. ५६ ठिकाणी विजयाच्या मार्जिनपेक्षा नवमतदार अधिक आहेत, तसेच मुंबईत होणाऱ्या तिरंगी चौरंगी लढती पाहता नवमतदारांचा वाटा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
====
निवडणूक झाल्यानंतर अनेक जण आपल्या मतदारसंघात लोकप्रतिनिधी चांगले काम करत असल्याची तक्रार करत असतात. मतदान करणे महत्त्वाचे कर्तव्य असून जर मतदान केले, तर तुम्हाला तक्रार करण्याचा काही अधिकार नाही.
वरून कुर्मे , वय २०
==========
विधानसभा निवडणुकीत यंदा मी पहिल्यांदा मतदानर आहे. ही माझयासाठी आनंद , अभिमानाची गोष्ट आहे. माझे मत हे विकासाला असणार आहे. मी उद्या मतदान करणार असून, तुम्हीही अवश्य मतदान करा.
वृषभ सुरवडे , वय १९
===
मतदान करणे हा आपला अधिकार आहे, असे म्हटले जाते. परंतु मला वाटते मतदान हा अधिकार नसून ही ताकद आहे. माझे मतदान हे देशाच्या भविष्यासाठी असणार आहे.
नीलावेणी नायडू, वय २०
====
जगात सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. या देशातील लोकप्रतिनिधींना निवडून देणे आपली जबाबदारी आहे. मी पहिल्यांदा मतदान करणार असून, हा एक अधिकार म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून मतदान करणार आहे.
अनुष्का वर्पे, वय १९
=======
मतदान करणे हे देशातील महत्त्वाच्या कार्यांपैकी एक आहे. मी प्रथमच मतदान करणार आहे. माझे मत माझा अधिकार असून, मी देशासाठी मतदान करणार आहे.
अंकित सिंग, वय १९
===
तरुणांसाठी ते मतदानासाठी पात्र होणे आणि पहिल्यांदा मतदानाची संधी मिळणे याला विशेष महत्त्व आहे. ज्यांना मतदान करता आले नाही त्यांना महत्त्व विचारा. त्यामुळे मी मतदान करणार असून, तुम्हीही न चुकता मतदान करा.
कुरेशी अब्बास, वय १९
===
मी प्रथमच मतदान करणार आहे. त्याची उत्सुकता आहे. मतदान हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मी माझे मत देशासाठी करणार आहे. इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजवायला हवा.
संकेत चंद्रमणी , वय १९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

