मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
मूलभूत सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचारी तैनात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मूलभूत सोयी-सुविधा, चोख सुरक्षा व्यवस्था आणि पुरेसे मनुष्यबळ मुंबई परिसरात नियुक्त करण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारीही सर्व नागरी सोयी-सुविधा आणि उपाययोजनांबाबत कार्यरत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबईतील सर्व मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या वेब कास्टिंग व्यवस्थेची जोडणी महापालिका मुख्यालयात उपलब्ध केली आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची पथके संंबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाली आहेत. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी एकूण १४ हजार १७२ बॅलेट युनिट, १२ हजार १२० कंट्रोल युनिट आणि १३ हजार १३१ व्हीव्हीपॅट संयंत्र तयार आहेत. प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर ४६ हजार ८१६ अधिकारी, कर्मचारी तसेच २५ हजार ६९६ पोलिस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतील, अशी माहिती गगराणी यांनी दिली.
---
मतदान केंद्र सज्ज
प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, प्रतीक्षालय, पंखे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, स्वच्छतागृह, कचरापेटी, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, दिशादर्शक फलक, मेडिकल कीट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

