तोतया पोलिसांनी केली मनसेची शाखा बंद

तोतया पोलिसांनी केली मनसेची शाखा बंद

Published on

तोतया पोलिसांनी केली मनसेची शाखा बंद

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : कल्याण ग्रामीणमधील आडीवली ढोकळी परिसरातील मनसेची शाखा मंगळवारी (ता.१९) दुपारी तोतया पोलिसांनी बंद केल्याची घटना घडली. यावेळी आरोपी हे या शाखेतील मतदार याद्या आणि वोटर स्लिप घेऊन गेले. या घटनेमुळे मनसेचे उमेदवार राजू पाटील संतापले, विरोधक सत्ताधारी अशा खेळी खेळत असतील तर उद्या मनसेची फौज मैदानात उतरवू, असा इशाराच राजू पाटील यांनी यावेळी दिला आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, ‘पोलिस अशी शाखा बंद करू शकत नाही. कारण इथे काही गैरप्रकार चालू नव्हते. दुपारच्या सुमारास इथे काही जण पोलिसांच्या वेशात आले आणि येथील याद्या आणि व्होटर स्लिप घेऊन गेले. सत्ताधारी पोलिसांना हाताशी धरून असा खेळ करत असतील तर मग आम्ही पण येथे उद्या फौज उतरवतो. सत्ताधारी येथे पैसा वाटतात; हे थांबले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, पोलिसांनी हा वॉर्ड संवेदनशील जाहीर करून येथे गस्त वाढवावी.’ याविषयी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांना विचारले असता पोलिसांनी असे काहीही केलेले नाही. पोलिस याठिकाणी गेलेले नाहीत. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी होते का. हे तोतया पोलिस कोण होते, त्यांना कोणी पाठवले, सीसीटीव्ही तपासून त्यांचा शोध घेतला जातो का? हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com