मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून जप्तीची नोटीस

मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून जप्तीची नोटीस
Published on

मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून जप्तीची नोटीस
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे सुमारे २२२ कोटी रुपयांची थकबाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महापालिकेकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असे नोटिसीद्वारे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. देयके मिळाल्यापासून मालमत्ताकर ९० दिवसांच्या आत महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कर भरणा करण्याची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती महापालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. करभरणा ऑनलाइन करण्यासाठी करदात्यांनी महापालिका संकेतस्थतळावरील माहितीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आाणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com