

जळालेल्या उभ्या ट्रकला दुचाकी धडकून दोघे ठार
पाथरी, ता. २९ (बातमीदार) : शॉर्टसर्किटने जळून खाक झालेला ट्रक दोन दिवसांपासून राज्य महामार्गावर उभा होता. या ट्रकला मंगळवारी एक व बुधवारी एक अशा दोन दुचाकी धडकून दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
राज्य महामार्गावरील सारोळा खुर्द शिवारात सोमवारी (ता. २५) एक ट्रक आष्टीच्या दिशेने जात होता. या वेळी ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून ट्रक रस्त्यावरच जळून खाक झाला. केबिनला आग लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान, मंगळवार (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीस्वार इस्राईल शहानूर बेग (वय ३८, रा. उपळी, ता. वडवणी, जि. बीड) हा या ट्रकवर धडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले होते, तर दुसरी घटना बुधवारी (ता. २७) दुपारी दीडच्या सुमारास याच ठिकाणी घडली. पाथरी तालुक्यातील हादगाव येथील सुरेश भागवत शिंदे (वय २७) हा दुचाकीने हादगावकडे जात होता. या वेळी महामार्गावरील जळालेल्या ट्रकला दुचाकी धडकली. या भीषण अपघात दुचाकी ट्रकमध्ये अडकून राहिली, तर सुरेश जागीच ठार झाला. दरम्यान, पहिल्या अपघातातील जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. हादगाव येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
-----
PRB24B41796 --- पाथरी : याच ट्रकला दुचाकी धडकून दोन तरुणांचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.