ढकलणाऱ्या तीन दलालांना अटक

ढकलणाऱ्या तीन दलालांना अटक
Published on

वेश्याव्यवसायप्रकरणी तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : आर्थिक परिस्थितीमुळे पैशांची गरज असलेल्या महिलांना हेरून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या तिघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कोलबाड येथून अटक केली. रईसा ऊर्फ खाला हनीफ खान (वय ४६), जोया अजरूद्दीन शेख (वय २५) आणि युसुफ अब्दुल रहिम शेख (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तीन दलालांनी काही महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकारी चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने ठाण्यातील उथळसर, कोलबाड रोडवरील सडकछाप रेस्टॉरंटच्या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवून ही कारवाई केली. दलालांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीसह आठ महिलांची सुटका केली. ही कारवाई महिला पोलिस निरीक्षक चेतना चौधरी, पोलिस उपनिरीक्षक डी. व्ही. चव्हाण, नीलेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भोसले या पथकाने केली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com