

भाईंदर, ता.२९ (बातमीदार): ऐन गर्दीच्या वेळी भाईंदर येथून सकाळी सुटणारी वातानुकूलित लोकल सेवा विरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या लोकलमुळे प्रवास करणे कठीण झाले असून रद्द करण्यात आलेल्या साधी लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रवाशांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
भाईंदर स्थानकातून दररोज सकाळी ८.२४ ची चर्चगेट साधारण लोकल सुटते. या लोकलच्या वेळेवर पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. सकाळची साधी लोकल चाकरमान्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी होती. नऊ ते दहाच्या सुमारास मुंबईतील कार्यालय गाठण्यासाठी हीच लोकल सोयीची होती. त्यामुळे लोकल गर्दीने तुडुंब भरलेली असते. अशातच पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल सुरू केली आहे, पण या सुविधेचा दर जास्त असल्याने दररोज प्रवास करणे अनेकांना परवडणारे नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलविरोधात आता प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, तसेच वातानुकूलित लोकल रद्द करून नेहमीची साधी लोकल सुरू ठेवावी, या मागणीसाठी प्रवाशांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
-------------------------------------------
पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. ८.२४ ची साधारण लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे, तसेच नेहमीच्या वेळेवर साधारण लोकल पुन्हा सुरू करताना आधी किंवा नंतर अतिरिक्त लोकल सुरू करावी.
- रोहिदास पाटील, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.