ऑनलाईन पाणी देयक भरण्यास अडचण

ऑनलाईन पाणी देयक भरण्यास अडचण
Published on

ऑनलाइन पाणी देयक भरण्यास अडचण
करदात्यांमध्ये नाराजी; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशी, ता. ३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने नुकतेच पाणी देयक भरण्यासाठी देयकांवर ऑनलाइन क्यूआर कोड छापला आहे; मात्र ऑनलाइन देयक भरण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी देयकधारकांनी संताप व्यक्त केला असून नाइलाजाने पुन्‍हा पालिकेच्‍या खिडकीबाहेर रांग लावावी लागत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणी देयक भरण्यासाठी विभाग कार्यालयामध्ये रांगेत ताटकळत उभे राहवे लागत होते. त्‍यामुळे पाणी देयक भरणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्‍यामुळे महापालिकेकडून ऑनलाइनची सुविधा देण्यात आली होती. पालिकेच्या पाणी देयकांवर क्यूआर कोड छापण्यात आले होते. यामुळे नागरिकांकडून ऑनलाइन देयके भरण्यास सुरुवात झाली. यामुळे करदात्‍यांच्‍या वेळ आणि पैशांची बचत होत असल्याने समाधान व्‍यक्‍त करण्यात येत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना ऑनलाइन पाणी देयक भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पाणी देयक ऑनलाइन भरता येत नसल्यामुळे नागरिकांना पुन्‍हा पालिका विभाग कार्यालयामध्ये रांगा लावाव्या लागत आहेत.
.......................
पाणी देयकांवरील क्यूआर कोडच्‍या माध्यमातून ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा देण्यात आली आहे; मात्र पाणी देयक भरण्यास कशामुळे अडचण येत आहे; याची माहिती घेण्यात येईल.
- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
....................
नवी मुंबई महापालिकेने ऑनलाइन पाणीबिल भरण्यासाठी देयकांवर क्यूआर कोड छापले आहेत; मात्र ऑनलाइन पाणीबिल भरण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे विभाग कार्यालयामध्ये जाऊन पैसे भरावे लागत आहेत.
- सचिन विनेरकर, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com