किन्हवली पोलिसांचा सन्मान

किन्हवली पोलिसांचा सन्मान
Published on

किन्हवली पोलिसांचा सन्मान
किन्हवली (बातमीदार) : सहा महिन्यांपूर्वी मुसळधार पाऊस व सततच्या विजेच्या लपंडावात अंधाऱ्या रात्रीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला होता; मात्र किन्हवली पोलिसांनी नियोजनबद्ध तपास करत सराईत चोरांना गजाआड केले आहे. याची दखल घेत पोलिस पाटलांनी किन्हवली पोलिसांचा सन्मान केला.
सहा महिन्यांपूर्वी खरीड, मळेगाव, भादाणे, सोगाव, ठुणे अशा अनेक गावांतील शाळा तसेच बंद घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरीच्या घटनांमुळे गावागातील नागरिक त्रस्त झाले होते.
किन्हवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्याचे पथक चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. चोर सराईत असल्यामुळे पुराव्याअभावी चोरांचा शोध लागणे कठीण जात होते, परंतु पोलिसांनी अनेक अडथळ्यांचा सामना करत चोरांचा कायमचा बंदोबस्त केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर, शरद सुरळकर, पोलिस हवालदार गणेश पवार, अर्जुन पारधी, सचिन चोरघे, विक्रांत महाजन, नवनाथ गवारी, जगदीश देसले, सतिष शेलवले, प्रवीण मोहपे यांनी विशेष मेहनत घेतली होती. याची दखल घेत पोलिस पाटलांनी किन्हवली पोलिसांचा सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com