

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एका बटणावर
शहापूरमध्ये ''अपार''साठी ४७ हजार विद्यार्थ्यांचा डेटा संकलित
खर्डी, ता. ३ (बातमीदार) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ''वन नेशन वन स्टुडंट आयडी'' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे एका बटणावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती कळणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शहापूर तालुक्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ४७ हजार २४७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तालुक्यात पहिली ते बारावीचे शिक्षण घेत असलेले एकूण ६८ हजार ३८५ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ही माहिती उपयोगी ठरणार आहे.
पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्री आयडी अर्थात अपार आयडी दिला जाणार आहे. अपार आयडी ही विद्यार्थ्यांची नवी ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना १२ अंकांचे क्रमांक असलेले एक कार्ड दिले जाणार आहे. या क्रमांकावर असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असेल. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या कार्डच्या नोंदणीसाठी प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत आहे. अपार कार्ड हे आधारकार्डशी जोडले जाणार आहे. त्यामध्ये पालकांच्या आधार कार्डचा समावेश करण्यात येत आहे.
सर्व विद्यार्थ्यांची अपार कार्डसाठी नोंदणी करताना २०२४/२५ या शैक्षणिक वर्षात स्थलांतरित मुलांना स्थलांतरापासून थांबवण्यात यावे, तसेच स्थलांतरित होणाऱ्या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात यावे, याबाबतही सविस्तर सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी आधार कार्डवरील नावात व शाळेतील रेकॉर्डवरील विद्यार्थ्यांच्या नावात बदल झाल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. या सर्व समस्या सोडवून त्यावर मार्ग काढण्यासाठी वेळ जात आहे. हे नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना बैठक घेत सूचना दिल्या आहेत.
डीजी लॉकरसारखी सुविधा
अपार कार्ड प्रणाली ही डीजी लॉकरसारखी सुविधा असणार आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, त्याला मिळालेले पुरस्कार, शिष्यवृत्ती इत्यादी माहिती उपलब्ध असणार आहे. यामुळे अपार आयडीला येणाऱ्या पुढल्या काळात खूप महत्त्व असणार आहे.
वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकाप्रमाणे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. अपार आयडीसाठी शाळेत काम सुरू आहे. ६९ टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व शाळांचा प्रतिसाद चांगला मिळत असून उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल.
-भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, शहापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.