

मोखाडा, ता. ३ (बातमीदार) : लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात एड्स निर्मूलन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला व पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रमुख वक्ते डाॅ. किशोर देसले यांनी विद्यार्थ्यांना एड्सचे गंभीर परिणामावर मार्गदर्शन केले. एनएसएस विभाग प्रमुख प्रा. एस. आर. व्हंडे यांनी या जागतिक दिनाचा मुख्य उद्देश समजावून सांगितला. एड्स हा रोग जगासमोरील सर्वात कठीण समस्या आहे. या आजारावर अजूनपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही. या आजाराला २०३० पर्यंत संपुष्टात आणण्याचे धोरण आखले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. किशोर देसले यांनी एड्स आजारावर सविस्तर माहिती दिली. तसेच या आजाराचे प्रमुख कारणे, त्याचे गंभीर परिणाम, उपचार पद्धती आणि समज-गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले आहे. या आजारावर प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मोखाडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले यांनी एड्स आणि एचआयव्ही यातील फरक काय आहे, याविषयी मार्गदर्शन केले आणि एच. आय. व्ही. ची प्रमुख कारणे सांगितले आहे. तसेच एड्सला प्रतिबंध घालण्याचे व समाजजागृतीचे आवाहन उपस्थितांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.