भिवंडीत बांधकाम कामगार संघटनेचा मोर्चा

भिवंडीत बांधकाम कामगार संघटनेचा मोर्चा
Published on

भिवंडीत बांधकाम कामगार संघटनेचा मोर्चा
भिवंडी, ता. ३ (बातमीदार): बांधकाम कामगारांना मागील अनेक वर्षांपासून मिळत असलेल्या लाभाविरोधी राज्य सरकारने घेतलेला सरकारी निर्णय त्वरित रद्द करावा, तसेच बांधकाम कामगारांसाठी असलेली सरकारसाठी ऑनलाइन वेबसाईट व बंद असलेली पोर्टल सेवा सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष कॉ. विजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर सोमवारी (ता. २) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो बांधकाम कामगार सहभागी झाले होते.

शहरातील एसटी स्थानकासमोरील वेताळ पाडा येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडले होते. सरकारने बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची ऑनलाइन सेवा बंद केल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. या ऑनलाइन सेवांमधून कामगारांना कुठूनही त्यांचा फॉर्म भरता येत होता, परंतु सद्यस्थितीत कामगारांना फॉर्म भरण्यासाठी कामगार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच कामगार कार्यालयात कर्मचारीवर्ग कमी आहे. परिणामी उशीर लागल्याने कामगारांचा रोजगार बुडत आहे.

सरकारने मागील कॅबिनेटमध्ये कामगारांसाठी मंजूर केलेला पाच हजार रुपये दिवाळी बोनस कामगारांना तत्काळ वितरित करावा, ज्येष्ठ कामगारांना पेन्शन लागू करावी, बंद असलेली वेबसाईट-पोर्टल सेवा सुरू करावी, अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक यांच्या वतीने शहरातील वेताळ पाडा येथील कामगार कार्यालयांतर्गत बांधकाम विभागासमोर मोर्चा काढण्यात आला. कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या ११ डिसेंबरला मुंबई येथील कामगार सेक्रेटरी ऑफिसच्या बाहेर हजारो कामगारांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती कॉ. विजय कांबळे दिली, तर या वेळी आमदार रईस शेख यांनी बांधकाम कामगारांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन उपस्थित कामगारांना दिले.

राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी असलेली ऑनलाइन वेबसाईट आणि लाभाच्या सोयीची पोर्टल सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थी बांधकाम कामगारांना सुविधांपासून वंचित रहावे लागत असून त्यांची हेळसांड होत आहे.
-कॉ. विजय कांबळे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com