तीन दिवस कबड्डी महोत्सव रंगणार

तीन दिवस कबड्डी महोत्सव रंगणार
Published on

शिवडी, ता. ३ (बातमीदार) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृतिप्रित्यर्थ सोमवार (ता. ९)पासून व्यावसायिक पुरुष अ गट, स्थानिक पुरुष अ गट आणि महिला गटाच्या स्पर्धांना सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरुवात होत आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा क्रीडा महोत्सव होत आहे. यंदाच्या कबड्डीच्या तीन विभागांत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये सुमारे ४८ नामवंत संघ खेळणार आहेत. क्रीडा महोत्सवात रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रो-कबड्डीतील डावखुऱ्या खेळाडूंचा रंजक खेळ पाहावयाला मिळेल. हे सामने ९ ते ११ डिसेंबर; तर अंतिम सामने त्याच क्रीडांगणावर १२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता पार पडतील.
गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा श्रमिक जिमखाना येथे रविवार (ता. ८)पासून दिवसभर होतील. जवळपास २४ नामवंत संघ या क्रीडा महोत्सवात उतरतील. सर्व सामने बाद‌ पद्धतीने खेळवले जातील. मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत, संघटक अशोक चव्हाण या स्पर्धांचे व्यवस्थापन पाहणार आहेत. क्रीडाप्रमुख उपाध्यक्ष सुनील बोरकर यांच्या नेतृत्वाखाली या सर्व स्पर्धा होणार आहेत. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सचिव शिवाजी काळे‌ आणि सर्व संघटन‌ सचिव; प्रकाश भोसले, अनिल पाटील आदी मेहनत घेत आहेत.

बुद्धिबळ स्पर्धा
शालेय १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ७ डिसेंबरपासून राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ येथे आयडियल स्पोर्ट क्लब अकादमीच्या सहकार्याने लिलाधर चव्हाण यांच्या व्यवस्थापनाखाली भव्य बुद्धिबळ स्पर्धा पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धा क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com