लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
Published on

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : सीबीडी भागात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने खारघरमधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या टेरेसवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पीडित मुलगी खारघरमध्ये राहण्यास असून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी डवेन शेख हा सीबीडी सेक्टर-९ येथे राहतो. काही दिवसांपूर्वीच डवेनची ओळख पीडित मुलीसोबत झाली होती. त्यानंतर त्याने त्रास देण्यास सुरुवात केली होती. सोमवारी रात्री आठच्या सुमारास पीडित मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. हा प्रकार पीडित मुलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर खारघर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली. त्यानुसार बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून मंगळवारी पहाटे पोलिसांनी डवेनला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com