

सीआयएसएफ जवानांची अंतर्गत चौकशी
कारचालकाशी झालेल्या वादावर खुलासा
खारघर, ता. ३ (बातमीदार) : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे कर्मचारी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. मागील आठवड्यात एक कारचालक आणि त्याच्या भावासोबत झालेल्या वादासंदर्भात अंतर्गत चौकशी केली जात असल्याचा खुलासा सीआयएसएफने केला आहे.
मागील आठवड्यात २९ नोव्हेंबर रोजी सीआयएसएफ जवानांची बस मुंबई विमानतळावरून खारघरकडे येत असताना, अचानक एक कार ओव्हरटेक करून बसपुढे येऊन थांबली. कारचालकाने बाहेर पडत बसचालकाला शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील वाद वाढत असल्याने बसमधील सीआयएसएफ जवानांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात हा गोंधळ सुरू असल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर या कारचालकाने सीआयएसएफ जवानांविरोधात, तर सीआयएसएफ जवानांनी कारचालक व त्याच्या भावाविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचे सीआयएसएफकडून स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.