विनयभंग करणाऱ्या टेलरला चोप

विनयभंग करणाऱ्या टेलरला चोप
Published on

उल्हासनगर, ता.३ (वार्ताहर) ः जीन्सचे अल्टरेशन करण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली आहे. सोमवारी सायंकाळी उल्हासनगर शहरात ही घटना घडली असून, पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील रेल्वे स्टेशन परिसरातील कपडे बाजारात एक तरुणी कपडे अल्टरेशन करण्यासाठी आली होती. जीन्सची ट्रायल देत असताना टेलरने विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला होता. हा प्रसंग शेजारीच असलेल्या एका दुकानदाराला सांगितला. त्याचवेळी तिथे खरेदी करायला आलेल्या काही ग्राहकांनी टेलरला जाब विचारण्यासाठी दुकान गाठले. या वेळी झालेल्या वादावादीत महिलेसोबत असलेल्या ग्राहकांनी टेलरला रस्त्यावर ओढून बेदम चोप देण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती ठाण्याचे दोन बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले; पण संतप्त जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. अखेर अतिरिक्त पोलिस दलाला पाचारण केल्यानंतर जखमी टेलरला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून अटक करण्यात आली. या वेळी टेलरला चोप देणाऱ्या महिलेसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com