पनवेल पालिका दीड लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

पनवेल पालिका दीड लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या
Published on

पनवेल पालिका दीड लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या
पनवेल, ता. ३ (बातमीदार) ः राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील एक ते १९ वर्ष वयोगटातील एक लाख ५० हजार ७०५ मुला-मुलींना बुधवारी जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत २६८ शाळा, १४८ अंगणवाड्यांमधून जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
जंतदोषामुळे बालकांमध्ये ॲनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो. शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुखी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, तसेच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे. ज्या मुला-मुलींना कोणत्याही कारणाने ४ डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी मिळाली नाही, तर त्यांना १० डिसेंबर रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे, तसेच एक वर्ष आतील बालकांना गोळी देण्यात येऊ नये, एक ते दोन वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पावडर करून पाण्यातून देण्यात यावी, दोन ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना एक गोळी पावडर करून पाण्यातून देण्यात यावी, तसेच दोन ते १९ वयोगटातील मुलांनी एक गोळी चावून खाल्ल्यानंतर त्यांना पाणी द्यावे, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत अंगणवाड्यांमधील मुले, सर्व शासकीय शाळेचे विद्यार्थी, शासकीय अनुदानित- विनाअनुदानित शाळेचे विद्यार्थी, महापालिका शाळेतील विद्यार्थी, सर्व कनिष्ठ विद्यालये, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी या सर्वांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com