रविवारी ठाण्यात ‘माझी आरोग्य तपासणी’

रविवारी ठाण्यात ‘माझी आरोग्य तपासणी’
Published on

रविवारी ठाण्यात ‘माझी आरोग्य तपासणी’
म्हाडा गृहनिर्माण सहकारी फेडरेशनतर्फे आयोजन
ठाणे, ता. ३ : ठाण्यात रविवारी (ता. ८) ‘माझी आरोग्य तपासणी’ या शिबिराचे आयोजन केले आहे. म्हाडा गृहनिर्माण सहकारी फेडरेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. या शिबिरात विविध आरोग्य चाचण्यांसह रक्तदान करण्याचीही संधी मिळणार आहे. तसेच, यावेळी अवयवदानाची माहितीही देण्यात येणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रकृतीच्या अनेक तक्रारी सुरू होतात. त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. या हेतूनेच पाचपाखाडी म्हाडा गृहनिर्माण सहकारी फेडरेशनने रविवारी (ता. ८) ठाण्यातील सावकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिर येथे सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात हाडांची घनता चाचणी होणार आहे. ४० वयापुढे हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते. विशेषत: महिलांमध्ये याचे विकार वाढत असल्याने त्याचा विशेष समावेश शिबिरात केला आहे. याशिवाय श्वसन चाचणी, नेत्रतपासणी, दृष्टीतपासणी, मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व तपासण्या मोफत असून वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टर्स करणार आहेत.
शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी खास रक्तदान शिबिराचेही आरोजन केले आहे. यावेळी अवयवदान व देहदानाविषयीही जागृती करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी ७७३८४८७९८९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com