हॉटेल्स आणि रस्टॉरन्टच्या सुरक्षेची घेणार झाडाझडती

हॉटेल्स आणि रस्टॉरन्टच्या सुरक्षेची घेणार झाडाझडती
Published on

थर्टी फर्स्टसाठी पालिका,
अग्निशमन दल सज्ज
हॉटेल्स, रेस्टॉरन्टच्या सुरक्षेची घेणार झाडाझडती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः आगामी थर्टी फर्स्टपूर्वी महापालिका आणि अग्निशमन दलाकडून मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टची अग्निसुरक्षेबाबत पाहणी केली जाणार आहे. या ठिकाणी अग्निसुरक्षेबाबतच्या नियमावलीचे पालन केले जाते की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेस्टॉरन्ट-हॉटेल्समध्ये रात्रभर पार्टी सुरू असते. यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पालिका आणि अग्निशमन दल सतर्क झाले आहे. अनेक हॉटेल्समध्ये अग्निशमन यंत्रणेचे नियम धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडून मुंबईतील रेस्टॉरन्ट-हॉटेल्समधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, अलीकडच्या काही दिवसांत मुंबईत आगीच्या घटना वाढल्या आहेत. अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसणे, यंत्रणेचे नूतनीकरण न करणे आदी कारणांमुळे या आगी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टपूर्वी मुंबईतील हॉटेल्समधील अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे की नाही, त्याची तपासणी आता केली जाणार आहे.
----------------
अग्निशमन यंत्रणेचे नियम न पाळल्यास संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे. अग्निसुरक्षेबाबत दुर्लक्ष केल्यास नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
- प्रशांत गायकवाड, उपायुक्त, मुंबई महापालिका
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com