महापालिकेच्या तीन शाळांचा कायापालट

महापालिकेच्या तीन शाळांचा कायापालट

Published on

महापालिकेच्या तीन शाळांचा कायापालट
अधिकाऱ्यांची पाहणी

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : नवीन वर्षात उल्हासनगर महापालिकेच्या तीन शाळांना आदर्श लूक देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संबंधित शिक्षण विभागाने अधिकारी आणि कंत्राटदारांनी या शाळांची पाहणी केली आहे. महात्मा जोतिबा फुले शाळा क्रमांक १७, गोपाळनगर सी ब्लॉक शहाड स्टेशन रोड या शाळेचे बांधकाम सुरू आहे. याव्यतिरिक्त अण्णा भाऊ साठे पालिका शाळा क्रमांक २४ (मराठी माध्यम), स्वामी लीला शाह शाळा क्रमांक १८ (हिंदी माध्यम) यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. येत्या शैक्षणिक वर्षात जून २०२५ पासून सर्व सुविधा असलेल्या नवीन इमारतींमध्ये तिन्ही शाळा सुरू होणार आहेत.

आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या शाळांचा कायापालट करण्याचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. त्यात भौतिक सुविधांसोबतच गुणवत्तावाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व शाळांची रंगसंगती एक करण्यात येत आहे. शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, प्रशासनाधिकारी दीपक धनगर, उपमुख्य लेखाधिकारी निलम कदम, वास्तुविशारद व विकसक, माजी संरचनात्मक अभियंता भूषण पाटील यांनी या शाळांची पाहणी केली आहे.

नव्या अभ्यासिकेचे काम प्रगतिपथावर
महानगरपालिकेच्या एकूण २१ शाळा आहेत. त्यात मराठी माध्यमाच्या आठ, हिंदी माध्यमाच्या १२ आणि एक गुजराती माध्यमाची शाळा आहे. या सर्व शाळांमध्ये चार हजार ५९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वी पुनर्बांधणी केलेल्या शाळांची संख्या चार असून एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बांधलेली आहे. या घडीला तीन शाळांची पुनर्बांधणी आणि आणखी एका नव्या अभ्यासिकेचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. तसेच, १९६० पूर्वीच्या बांधकाम असलेल्या शाळांची संख्या १४ असल्याची माहिती आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com