खारघर खाडीत देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन

खारघर खाडीत देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन

Published on

खारघर, ता. ७ (बातमीदार) : थंडीची चाहूल लागताच अनेक स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला अनुकूल प्रदेशात जात असतात. सध्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या खारघर खाडीत देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल पाहावयास मिळत असून, पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत.
खारघर सेक्टर ८, १०, १६, १७ मधील वास्तुविहार तसेच रांजणपाडा आणि मुर्बी गावाच्या मागील बाजूस खाडी आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी विविध रंगी, आकर्षक पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत आणि त्यांची छबी टिपण्यासाठी पक्षीप्रेमींमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. खाडीकिनारा असलेली पाणथळ जागा पक्ष्यांसाठी नेहमीच आकर्षणाच्या केंद्र ठरल्या आहेत. थंडीची चाहूल सुरू होताच पक्ष्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. यामध्ये रशिया आणि मध्य आशियामधील स्थलांतरित पक्ष्यांचे खारघरमध्ये मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. यामध्ये आफ्रिकेतील रोहित (फ्लेमिंगो), सारस बगळे, रेड बुलबुल, बी इटर, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लेव्हर, जांभळा हेरॉन, मार्श हॅरिअर, चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे, दुर्मिळ ब्लॅक टेलेड गॉडविट्स, कर्ल्यू सँडपायपर्स या पक्ष्यांनी खारघर खाडीमध्ये आपले बस्तान मांडल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.
------------
खारघर खाडीत मोठ्या संख्येने देशी-विदेशी पक्षी स्थलांतरित होत असल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंद पसरला आहे. पनवेल महापालिका आणि सिडकोने या ठिकाणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास केल्यास त्याला पर्यटनप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.
- ए. के. नूल, छायाचित्रकार व पक्षीप्रेमी, खारघर
----------------
खारघरच्या खाडीकिनाऱ्यावर दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. येथील खाडीचे संवर्धन करून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारल्यास पर्यटनक्षेत्र म्हणून उदयास येईल. तसेच दुर्मिळ पक्ष्यांची रेलचेल वाढेल.
- ज्योती नाडकर्णी, पक्षीप्रेमी
----------------
डेब्रिजमुळे खाडी धोक्यात
खारघरला निसर्गाने मोठ्या प्रमाणात खाडीकिनारा उपलब्ध करून दिला आहे, मात्र त्याकडे सिडको, पनवेल पालिका आणि वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे डेब्रिजमाफिया मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करीत आहेत. तसेच काहींनी शेड उभारले असून, शेडपर्यंत चारचाकी वाहन जावे यासाठी डेब्रिजचा भराव करून रस्ता तयार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com