भाजपच्या माजी गटनेत्यावर अदखलपात्र गुन्हा
भाजपच्या माजी गटनेत्यावर अदखलपात्र गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे महापालिकेचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांना गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा देणे, चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात शहर विद्रूपीकरण करून शहराच्या सौंदर्यात बाधा आणल्याप्रकरणी महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे कार्यालयीन उपअधीक्षक मोतीलाल कुवर यांनी नोंदवली आहे.
१० सप्टेंबरला माजिवडा, मानपाडा या प्रभाग समितीचे लिपिक शुभम लिंभोरे, शिपाई रूपेश मेहेर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकाम, बॅनर्स, होर्डिंग, पोस्टर्स, फ्लेक्स यावर कारवाईसाठी दोन पंचांसह फिरत होते. यावेळी पाटलीपाडा, माझी आई शाळेजवळ ब्रह्मांड हिरानंदानी रोड याठिकाणी रस्त्याचे मधोमध पथदिव्याच्या लोखंडी खांबावर गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देणारा माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी फलकाद्वारे जाहिरात व शहराचे विद्रूपीकरण केल्याचे आढळून आले.
ब्रह्मांड स्वस्तिक पार्क येथील रस्त्याचे मधोमध पथदिव्याच्या लोखंडी खांबावर गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या फलकावर मनोहर डुंबरे यांचा मोबाईल क्रमांक आणि नाव नमूद असल्याचे आढळले. अधिक माहिती घेतली असता त्यांनीच फलकाद्वारे जाहिरात केल्याची खात्री झाली आहे. या दोन्ही फलकांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा आणल्याने मनोहर डुंबरे यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

