वाहतूक पोलिसांना आरोग्याचे धडे
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावर थांबावे लागत असल्याने त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियमितपणे कर्तव्य बजावताना आरोग्य कसे सुदृढ ठेवावे, याबाबत कोपरखैरणे वाहतूक शाखेतील अंमलदारांसाठी डॉ. रंजन जोशी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. योग्य उपचारांसोबतच संतुलित आहार, निर्व्यसनी जीवनपद्धती, नियमित व्यायाम, योग ध्यानधारणा, मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे, नियमित आरोग्य तपासणी व उपचार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आहारात काय खावे आणि आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, कर्तव्यावर असतानासुद्धा कशा पद्धतीचा व्यायाम करता येऊ शकतो, याबाबत डॉ. रंजन यांनी पोलिसांनी मार्गदर्शन केले. या वेळी कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्यासह अंमलदार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

